PostImage

Nikhil Alam

March 29, 2024   

PostImage

Gadchiroli: महाराष्ट्र _छत्तीसगड सीमेवर पोलीस- नशीबवाद्यांमध्ये चकमक...


गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : गडचिरोली आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवरती भागातील भ भूमिका गावानजीकाच्या जंगलात बुधवारी (दिनांक.28) रात्रभर पोलिस आणि नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक झाली. पोलिसांनी घटनास्थळावरून नक्षल साहित्य ताब्यात घेतले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात करण्याच्या हेतूने कसनसूर, चातगाव दलम आणि छत्तीसगड मधील अवधी दलांचे नक्षलवादी एल्टापल्ली तालुक्यातील भूमकान गाव नजदीकच्या जंगलात एकत्र आले होते. त्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या नेतृत्वात C -60 पथक आणि केंद्रीय राखीव दलाच्या जलद प्रतिसाद पथकाच्या जवानांना त्या भागात पाठविण्यात आले. संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वा. पर्यंत पोलिसांनी नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. नक्षल्यांनी बॅरल ग्रॅनेट लांचर चा मारा केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देऊन हल्ला परतून लावला. त्यानंतर पुन्हा मध्यरात्रीपासून पहाटे साडेचार पर्यंत चकमक उडाली. यात कुणीही जखमी झाले नाही. नक्षलवादी अंधाराचा फायदा घेत जंगलात पसार झाले.

आज संध्याकाळी पोलिसांनी घटनास्थळावरून बॅटरी, वायर, पिट्टू आणि अन्य जीवनावश्यक साहित्य ताब्यात घेतले. पोलीस या भागात अजूनही नक्षलविरोधी अभियान राबवित असल्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितले आहे.